Pune Ganpati visarjan : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी
थोडक्यात
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी
गणपती विसर्जनासाठी यंत्रणा सज्ज
गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
(Pune Ganpati visarjan) दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी 9:30 वाजता विसर्जन मिरवणुका सुरू होणार आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपती पासून होते. यंदा मानाच्या पाच ही गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरात मोठी गर्दी होते.
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन असणार आहे. गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा तयारी पूर्ण झाली आहे.